Title Image
Home  /  Testimonial   /  सौ. प्राजक्ता पाखले डोंबिवली

सौ. प्राजक्ता पाखले डोंबिवली

नाडीचे ठोके व शरीरातील ऑक्सिजन चे प्रमाण ह्याच तंत्र बिघडल्यास ताप,सर्दी व खोकला ह्यांच्या समवेत माणसासमोर उभा ठाकतो तो उभ्या जगाला चिनी देणगीने छळणारा वैश्विक आजार कोविद-१९ अर्थातच कोरोना
अत्यंत धार्मिक व सकारात्मक विचार हा स्थायी भाव असल्याने व सदगुरु रामकृष्ण सरस्वती महाराज अहमदनगर ह्यांच्या कृपा-आशिर्वाद ह्यांच्या जोरावर ते आज रोजी सुदृढ घरी परतले.
त्यांच्यावर उपचार करणारे देवदुत श्री. प्रितम अहिरराव व सुश्रृषा सेवक पॅनसिया नाशिक ची मंडळी ह्यांच्या सदैव ॠणातच राहू.
ह्यांचे योगदान स्पृहणीय आहेच. कुठलाही किंतु-परंतु मनी न बाळगतो धैर्य देणे व सहकार्य करणे ह्याचा अनोखा परिपाकच घालून दिलाय. काय शब्दात धन्यवाद देणार??? आदर निर्माण केला आमच्या समस्त परिवाराच्या मनात. तनाने भले ही शक्य नाही पण मनाने नतमस्तकच.
मोराणकर परिवार तर उल्लेखितांचा ॠणी आहेच पण ह्या कठीण काळात कळत-नकळत अनेकांनी सहकार्य केले त्यांचेही ॠणी आहेतच.
पुनश्च त्रिवार धन्यवाद.
सदैव ऋणात आपलेच…..
सौ. प्राजक्ता पाखले डोंबिवली