Title Image
Home  /  Testimonial   /  सुनील सीताराम देसाई

सुनील सीताराम देसाई

ऋण निर्देश

°°°सलाम आपल्या कर्तव्याला°°°

आदरणीय प्रंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या  वाढदिवस निमित्त भारतीय जनता पार्टी कडून सेवा सप्ताह  साजरा केला जात आहे. मी गेल्या ५ दिवसांपासून करोना आजारामुळे उपचारासाठी असल्यामुळे  सर्व कर्मचाऱ्या बरोबर सेवा दिवस साजरा केला…

कोरोनाच्या संकटाच्या काळात भारतीय जनता पार्टीचा द्वारका मंडलाचा अध्यक्ष या नात्याने स्वतःला जनसेवेच्या काळात झोकून दिले होते.आणि ते करताना मी सातत्याने खूप काळजीही घेत होतो.परंतु कोरोनाने मला तसेच माझ्या कुटुंबीयांना विळखा घातलाच. उपचार घेण्याच्या अगोदर सुरूवातीच्या काळात माझ्यावर डॉ.प्रीतम अहीरराव, ( MD Medcin ) यांनी माझ्यावर उपचार केले. त्यानंतर उपचारासाठी दाखल झालो.. कर्मचारी वर्गाने माझी चांगली सुश्रुषा केली. माझ्यावर उपचार सुरु असतांना माझी तसेच माझ्या कुटुंबीयांची आस्थेने विचारपूस करून भाजपासह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी तसेच माझ्या मित्रपरिवाराने आम्हाला केवळ धीरच दिला नाहीतर जगण्याचे बळ दिले. त्या सर्वांचा मी व माझे कुटुंबीय अत्यंत ऋणी आहेत.

हॉस्पिटल येथे काम करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, वॉर्डबॉय, व मावशी या करोना योद्धे यांचा सत्कार सन्मानपत्र,पेढ़े व पुष्पगुच्छ देऊन केला. पुनश्च एकदा सर्वांचे आभार. मी तसेच माझ्या कुटुंबीयांवर यापुढेही सतत असाच प्रेमाचा वर्षाव सुरू राहील अशी मी अपेक्षा बाळगतो. धन्यवाद !

आपलाच

सुनील सीताराम देसाई ऋण निर्देश